सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सचिन वाझेचं शिवसेनेच्या अनिल परबांशी कनेक्शन?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारं प्रकरण म्हणजे मनसुख हिरेन हत्या प्रकरण या प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिम काही अंशी खराब झाली.

Sudarshan MH
  • May 24 2021 2:13PM

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारं प्रकरण म्हणजे मनसुख हिरेन हत्या प्रकरण या प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिम काही अंशी खराब झाली. पोलीस अधिकारी सचिन वाझेला या प्रकरणात अटक करण्यात आली. त्याच्यापाठोपाठ काही निलंबित पोलिस कर्मचारी, बुकी आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात बड्या नेतेमंडळींचा हात आहे की नाही याबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. याच दरम्यान भाजपचे किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे प्रकरणाचा संबंध थेट शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी जोडला आहे. 

शिवसेनेचे वरच्या फळीतील नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. कोकणातील दापोली येथे परब यांनी बेकायदेशीररित्या एक रिसॉर्ट उभारला असून त्यासाठी त्यांनी १० कोटी खर्च केले आहेत. या पैशाचा हिशेब द्यावा, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज सोमय्या यांनी एक गौप्यस्फोट केला. सचिन वाझेच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एक प्राडो कार सापडली होती. ही कार सध्या NIAच्या ताब्यात आहे. या कारचा अनिल परब यांच्याशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचा सोमय्या यांनी दावा केला. अनिल परब यांचे भागीदार सदानंद कदम आणि सदानंद कदम यांचे भागीदार विजय भोसले. मनसुख हिरेन प्रकरणात NIA च्या ताब्यात असलेली प्राडो कार ही विजय भोसले यांनी वाझेला दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही किरीट सोमय्या आणि भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. अनिल परब यांनी कोकणातील दापोली येथे वाळूवर एक रिसॉर्ट बांधला असून तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या बांधकामाची पर्यावरण मंत्रालयाच्या एका विशेष टीमकडून चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. याचसंबंधी राज्यपाल कोश्यारी यांनीही प्रकरणात लक्ष घालावे आणि परब यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार