सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं..

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Sudarshan MH
  • Jun 12 2021 9:14PM

आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात येणार आहे, असं विनायक मेटे यांनी सांगितलं. 

विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. 5 मे रोजी कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं. पण एक महिना उलटला तरी सरकारने अजून फेरविचार याचिका दाखल केली नाही. यापेक्षा निष्क्रियपणा दुसरा कोणता असू शकतो. आम्ही 5 तारखेपासून सांगतोय ते ऐकलं जात नाही. माजी न्यायामूर्ती भोसले यांच्या समितीने सांगितलेलं ऐकायचं नाही. याचाच अर्थ सरकारला मराठा आरक्षणाचं देणंघेणं राहिलेलं नाही. केवळ दिल्लीला जाऊन ठाकरे-चव्हाणांनी लोकांना वेड्यात काढलं आहे. दिल्ली भेटीत मराठा आरक्षणाचा विषय तोंडी लावायला होता. राज्यात मराठा समाजाचा रोष वाढल्यामुळे दिल्ली भेट झाली. काही तरी करतोय हे दाखवण्यासाठी ही भेट होती. प्रत्यक्षात मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, असं मेटे म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार