सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण:* *मंत्रीमंडळ उपसमितीतील चर्चा सकारात्मक - ऊर्जामंत्री*

मुंबई - पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणारा 7 मे रोजी काढलेल्या जीआरच्या विषयावर आज मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

Sudarshan MH
  • Jun 2 2021 10:19AM



मुंबई -  पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणारा 7 मे रोजी काढलेल्या जीआरच्या विषयावर आज  मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा पार पडली असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 
पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज या उपसमितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीनंतर डॉ. राऊत हे माध्यमांशी बोलत होते.
    या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून या प्रश्नावर निश्चितच तोडगा निघेल याची मला खात्री आहे, असं राऊत म्हणाले. " आजच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली. या विषयावर निर्णय घेण्याबद्दल एकमत झाले. या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची पुढील सुनावणी 21 जून रोजी आहे. त्यामुळे थांबायचे की पुढे जायचा हा पेच आहे. मात्र उपसमिती या विषयावर सकारात्मक आहे," असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अँड. के. सी.पाडवी, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. 

"या संदर्भात कायदेशीर अभ्यास करायचे आम्ही ठरवले आहे. कायदेशीर बाबी अनेक आहेत, तशाच इतरही अनेक बाबी आहेत आणि सकारात्मक निर्णय होईल. तीन पक्षाचे सरकार आहे. आता फक्त निर्णयाप्रत पोहोचायचं आहे. अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय सकारात्मक असेल", असं ते म्हणाले.
   मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या आरक्षणावर भर देऊन ते कसं कार्यान्वित करता येईल या विषयी आज चर्चा झाली. लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास डॉ राऊत यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार