सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अवैध फोन टॅपिंग, चौकशीसाठी समिती जाहीर

मुंबई : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे फोन

Sudarshan MH
  • Jul 10 2021 1:37PM


मुंबई : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे फोन बेकायदा टॅपिंग करण्यात आल्याच्या प्रकरणाची पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे. तीन महिन्यांत चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश गृह विभागाने दिले.


मागील सरकारच्या काळात राज्यातील आमदार-खासदारांचे फोन टॅप करण्यात येत होते. आपला फोन अमजद खान नावाने टॅप करण्यात येत होता. तसेच बच्चू कडू, रावसाहेब दानवे यांचे स्वीय साहाय्यक आदी अनेकांचे फोन टॅप करण्यात येत होते.
लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे. अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे दाखवून आपला फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात के ला होता. त्या वेळी अन्य सदस्यांनीही फोन टॅपिंगवर आक्षेप घेत या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी के ली होेती.

अशा प्रकारे फोन टॅपिंग करणे गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्या वेळी सभागृहात दिली होती. त्यानुसार फडणवीस सरकारच्या काळात म्हणजेच २०१५ ते २०१९ दरम्यान झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा) यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.
ही समिती पाच वर्षांत अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन बेकायदा टॅप करण्यात आले का याची तीन महिन्यांत चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचे काम समितीवर सोपविण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार