सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं मोठं विधान.. वाचा..

मुंबई: मुंबई: भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील.

Sudarshan MH
  • Jul 5 2021 11:12AM

मुंबई: मुंबई: भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील. नवं मैत्रिपर्व सुरू होईल, असे आडाखे बांधले जात असताना राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली व काही महत्त्वाची विधानं केली. शिवसेनेसोबत आमचं शत्रुत्व नाही तर वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांची भेट झाली का, दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढते आहे का, असे प्रश्न विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर काही बाबी स्पष्ट केल्या. अशी कोणतीही गाठभेट वा चर्चा झाल्याची मलातरी कल्पना नाही. राज्यात भारतीय जनता पक्ष एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावत असून जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाऊन लढण्यास तयार आहोत, असे फडणवीस म्हणाले. शिवसेनेसोबतच्या संबंधांवरही ते बोलले. शिवसेनेशी आमचं कोणतंही शत्रुत्व नाही, तर केवळ वैचारिक मतभेद आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी आमचा हात सोडला आणि ज्यांच्याविरोधात लढले त्यांचा हात पकडला म्हणूनच मतभेद निर्माण झाले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेसोबत पुन्हा मैत्रीच्या चर्चांबाबत विचारते असता, राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो. जर तर करणाऱ्यांना केवळ स्वप्नच पाहत बसावं लागतं. म्हणूनच राजकारणात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले. रामदास आठवले यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला शिवसेना-भाजपला सांगितला होता. त्याकडे लक्ष वेधले असता आठवले यांनी योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकलं असतं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असे फडणवीस म्हणाले. पुढची २५ वर्षे मला राजकारण करायचे आहे. त्यामुळे बोलताना मी विचार करूनच बोलतो, असे उत्तर एका प्रश्नावर फडणवीस यांनी दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार