सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालकमंत्री आपल्या भेटीला'उपक्रमात आर सेंट्रल आणि आर नॉर्थ वॉर्ड मध्ये ३६९ प्राप्त अर्जापैकी १०५ अर्जदारांनी मांडल्या समस्या.

दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार :-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Deepak Chavhan
  • Oct 10 2022 5:19PM
मुंबई, दि.१०:दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजना  महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी मिळण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
      आर सेंट्रल  व आर नॉर्थ वॉर्ड- बोरविली पश्चीम  येथे  पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या दारी' या उपक्रमात मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी  खासदार गोपाळी शेट्टी, आमदार प्रविण दरेकर,मंदा म्हात्रे,मनीषा चौधरी,प्रकाश सुर्वे,सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यासह   सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        महानगरपालिका क्षेत्रातील ४० टक्के पेक्षा जास्त अपंग असणा-या दिव्यांगाना शासनाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी मिळाल्या पाहिजेत  तसेच दिव्यांगासाठी स्टॉल देण्याचा प्रश्न मार्गी लावावा  अशी तक्रार आर सेंट्रल वॉर्ड मधील इकबाल इब्राहिम शेख यांनी  मांडली त्याला उत्तर देताना मंत्री श्री.लोढा म्हणाले,दिव्यांगासाठी  केंद्र,राज्य तसेच महापालिकेच्या योजना राबविण्यात येतात अशा वेळी,नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जावे लागू नये यासाठी महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.

       बोरीवली(पू) महाकालीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणातंर्गत १५ वर्षे झाले तरी पूर्ण न झालेबाबत, रेल्वे,घनकचरा,पाणी वेळेत न येणे,नादुरूस्त स्ट्रीट लाईट दुरूस्त करून मिळाव्यात यासह  ३६९  विविध विषयांवर नागरिकांनी  आपल्या तक्रार अर्ज दिले.तर १०५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

        'पालकमंत्री आपल्या भेटीला' हा उपक्रम दि. १२ ऑक्टो रोजी एल वॉर्ड- कुर्ला पश्चीम येथे असून. नियोजित रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही  जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in  बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार