सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 'एनआयए'च्या रडारवर; मुंबईतील घरावर छापे

मुंबईः अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरण हत्या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पहाटे सहाच्या सुमारास शर्मा यांच्या घरी छापेमारी केली आहे.

Sudarshan MH
  • Jun 17 2021 1:52PM


मुंबईः अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरण हत्या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पहाटे सहाच्या सुमारास शर्मा यांच्या घरी छापेमारी केली आहे. दरम्यान, शर्मा यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ गाडीतील स्फोटके प्रकरण व मनसुख हिरण हत्याप्रकरणी प्रदीप शर्मा यांचं नाव आलं होतं. याआधीही एनआयएनं शर्मा यांना समन्स पाठवले होते. तेव्हा प्रदीम शर्मा यांची कसून चौकशी करण्यात आली होती. शर्मा आणि सचिन वाझे हे एकमेकांच्या संपर्कात असून या कटाविषयी शर्मा यांना माहिती असावी, असा संशय तपाय यंत्रणेला आहे. 

आज सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी पहाटे एनआयएच्या टीमनं धाड टाकली असून अद्यापही त्यांची चौकशी सुरु आहे. शर्मा यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच एनआयएनं शर्मा यांच्या दोन निकटवर्तीयांना ॲंटिलिया स्फोटकं आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार