कर्नाळा बँक घोटाळा: माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक
मुंबई: कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.
मुंबई: कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील विवेक पाटील हे प्रमुख आरोपी आहेत. मुंबई ईडी झोन-२चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी पाटील यांना त्यांच्या पनवेलमधील घरातून ताब्यात घेतले आहे. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशील कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार अखेर आज पाटील यांना अटक करण्या आली.
कर्नाळा बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी काही महिन्यांपूर्वी मोर्चे देखील काढण्यात आले होते. पनवेल संघर्ष समितीने दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरुवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.
कर्नाळा बँकेचा ईडी स्वतंत्र्यरित्या तपास करणार असल्याने आता कुणाकुणावर अटकेची कारवाई होते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प