सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय स्वागतार्ह

मुंबई दि.7 - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी गरिबांना येत्या दिवाळी पर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

Sudarshan MH
  • Jun 8 2021 11:12AM

हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे मोदी सरकार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


 मुंबई दि.7  - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून  देशभरातील 80 कोटी गरिबांना येत्या दिवाळी पर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा स्वागतार्ह  निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे मोदी सरकार असल्याची प्रचिती देणारा हा  निर्णय असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी मे जुन महिन्यात पी एम गरीब कल्याण अन्न योजनेतून अन्नधान्य गरिबांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जून महिन्याच्या पुढे दिवाळी पर्यंत या योजनेचा विस्तार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याण दृष्टी चे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत असे रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. 

 देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महाराष्ट्रात तर मोठया प्रमाणात  कोरोनाचा कहर वाढला आहे.महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यात कडक निर्बंध लागले आहेत. लोकडाऊन लावण्यात आला आहे.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मोलमजुरी मिळत नाही.  रोजगार बुडाला आहे.त्यामुळे गरिबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे.गरिबांचे हे दुःख नेमके ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण अन्नयोजने द्वारे देशभरातील 80 कोटी गरिबांना दिवाळी पर्यंत  प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत  देण्याचा घेतलेला  निर्णय अत्यंत योग्य आणि गरिबांप्रति त्यांची कटीबद्धता  दाखविणारा निर्णय आहे अशा शब्दांत रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार