सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, गृहनिर्माण संस्थांसह कंपन्यांमध्ये लसीकरणास परवानगी, नियम पहा..

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम युद्धपातळीवर राबवली जात आहे.

Sudarshan MH
  • May 12 2021 9:23AM


मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम युद्धपातळीवर राबवली जात आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची लोकसंख्या कोट्यावधींच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लसीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना 
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपनी आता मुंबईतील लसीकरण केंद्राशी करार करू शकतील. त्यासाठी पालिकेने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक सूचनाानुसार गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांना स्वत: लस खरेदी कराव्या लागतील. त्यानतंर लसीकरण शिबीर घ्यावे लागेल.

इतकंच नव्हे तर कामाच्या ठिकाणी लसीकरण शिबीर भरवता येतील. मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्रे आणि गृहनिर्माण संस्था / कंपनी या दोघांना संयुक्तपणे डोसची किंमत ठरवावी लागेल. या कंपनीत / गृहनिर्माण संस्था आणि खाजगी रुग्णालयात समन्वय साधणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार जर लसीकरणाचा हा प्रयोग यशस्वी झाला तर अशाप्रकारे आणखी डोर-टू-डोर लसीकरण अभियान सुरू केले जातील. या शिबिरांतील रुग्णांची जबाबदारी गृहनिर्माण संस्था आणि कंपनीची असेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार