सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरे CEO च्या घरात कचऱ्यात सापडले ३.५ कोटी रुपये

मुंबई: घराच्या दुरुस्तीसाठी परवानगी देण्याकरता ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आरे दुग्ध वसाहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड यांना अटक केली आहे.

Sudarshan MH
  • May 26 2021 6:04PM

मुंबई: घराच्या दुरुस्तीसाठी परवानगी देण्याकरता ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आरे दुग्ध वसाहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड यांना अटक केली आहे. त्यांच्या घराची सोमवारी झडती घेतली असता पालापाचोळ्याच्या कच-यासोबत ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत बेहिशोबी रक्कम सापडली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता तीन कोटी ४६ लाख रुपये असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी खुल्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर असंपदेचाही आणखी एक गुन्हा दाख होऊ शकतो. 

५० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर राठोड यांच्या घरी शोध मोहिम राबवण्यात आली. त्यात घरातील बेड, घराच्या मागच्या बाजूला व टेरेसवरील कच-याच्या पिशवीसोबत ठेवण्यात आलेल्या प्लास्टीकच्या पिशवीत ही रोख रक्कम सापडली आहे. एसीबीने यासाठी राठोड यांचे घर पिंजून काढले होते. बेडच्या खाली, टेरेसवर कच-याच्या पिशवीसोबत सापडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यात व घराच्या मागच्या बाजूला छोट्या बागेसारख्या भागात पिशव्यांमध्ये मिळून तीन कोटी ४६ लाख १० हजार रुपये सापडले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार