“घराबाहेर पडू देणार नाही”;सोमय्यांना धमकी
मुंबई: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना धमकी मिळाली आहे.
मुंबई: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना धमकी मिळाली आहे. या संदर्भात त्यांनी मुलुंडचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना पत्र पाठवून, आवश्यक ती पावलं उचलण्याची विनंती केली आहे. किरीट सोमय्या हे नेहमीच चर्चेत असतात. नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरुन त्यांची सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलने सुरु असतात.
दोन दिवसांपूर्वी १३ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास व्हॉट्स अॅपवर त्यांना एक मेसेज आला. हा मेसेज मराठीमध्ये होता. '१ जून नंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही, काय करतो बघ. मुलुंडला येऊन सांगतो तुला' असा तो संदेश होता. हा धमकीचा संदेश पाठवणारा माणूस कोण आहे? ते मी शोधू शकलो नाही. त्यामुळे आरोपीला शोधून काढण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व करा असे किरीट सोमय्या यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी सध्या महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरण लावून धरण्यासाठी ते ओळखले जातात.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प