सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षणाच्या अहवालातील 4 हजार पाने गायब ? भाजपच्या बड्या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ

मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजामध्ये नाराजी पसरलीये.

Sudarshan MH
  • May 10 2021 1:55PM


मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजामध्ये नाराजी पसरलीये. आरक्षण रद्द झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून मुकावं लागल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी एक आरोप करुन राज्यात खळबळ उडवून दिलीय. त्यांनी मराठा आरक्षणा संदर्भातील मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालातील तब्बल 4 हजार पाने गायब असल्याचं म्हटलंय.

बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केलाय. त्यांनी मराठा आरक्षण संदर्भातील मागास वर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालातील तब्बल 4 हजार पाने गायब असल्याचा आरोप केलाय. तसेच गायब झालेले 4 हजार पाने ही सुप्रीम कोर्टात दाखल झाली नसल्याचंही वक्तव्य त्यांनी केलंय. सोबतच त्यांनी मराठा समाजाचा कोणी विश्वास घात केला ? असा सवाल केला. या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणीसुद्धा लोणीकर यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार