मुंबईत अंडरवर्ल्ड सक्रिय..डी कंपनीच्या फईम मचमचकडून बिल्डरला ५० लाखांच्या खंडणीसाठी फोन..
मुंबई: घाटकोपर येथील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाला ५० लाख रूपयांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन आल्यामुळे बांधकामी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई: घाटकोपर येथील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाला ५० लाख रूपयांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन आल्यामुळे बांधकामी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. हा धमकीचा फोन अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या अतिशय जवळच्या मानल्या जाणाऱ्या फईम मचमच नावाने आला असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे.
घाटकोपर पश्चिम येथे राहणाऱ्या एका बड्या बांधकाम व्यवसायिकला मागील काही आठवड्यापासून इंटरनॅशनल क्रमांकावरून खंडणीसाठी सतत धमकीचे फोन येत आहे. फोन करणारी व्यक्ती दाऊद टोळीच्या नावाने धमकी देत असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. या प्रकरणी या बांधकाम व्यवसायिकाने मुंबई गुन्हे शाखा या ठिकाणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे, खंडणी विरोधी पथकाने तीन दिवसापूर्वी बांधकाम व्यवसायिकाला घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाने स्वतःजवळ ठेवला आहे.
फहीम मचमच डी कंपनी मधील मोठे नाव:
दाऊद ला छोटा राजनने सोडल्या नंतर राजनची जागा माचमच ने घेतली..
मचमच वर खंडणी आणि धमकावण्याचे शेकडो गुन्हे दाखल आहेत ..
डी कंपनीसाठी शार्प शूटर भरती करण्याची जबाबदारी माचमचवर आहे ..
फेसबुक च्या मदतीने भरती करतो..
उत्तर प्रदेश, मुंबईचा कुर्ला, गोवंडी, वांद्रे, सकीनाका, रत्नागिरी, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यांमधून करतो भरती ..
फहीम ला फहीम मचमच हे नाव का पडले? कारण तो खूप बडबड करतो..
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प