सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खाजगी रुग्णालयाने शासकीय योजना राबवाव्यात पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन .

वसई विरार शहरातील खाजगी रुग्णालायांमध्ये शासकीय दरात उपचार केले जात नसतील किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार करुन शासकीय योजना राबवाव्यात

Manish Gupta
  • Jul 5 2020 1:34PM
 मनीष गुप्ता ( वसई ) 

पालघर  : वसई विरार शहरातील खाजगी रुग्णालायांमध्ये शासकीय दरात उपचार केले जात नसतील किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार करुन शासकीय योजना राबवाव्यात   असे आवाहन कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री दादाजी  भुसे यांनी  केले. 

या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समिती स्थापन कऱण्याचे निर्देशही त्यांनी पालिकेला दिले.
  शहरातील कोरोनाची वाढती संख्या आणि त्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालघर जिल्हयाचे पालकमंत्री दादाजी  भुसे यांनी गुरूवारी शहरात भेट दिली. वसई विरार मधील १० खाजगी रुग्णालयांत शासकीय दरात करोनावर उपचार कऱण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे तर ४ रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करोनाबाधीतांवर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र पालिका क्षेत्रातील रुग्णालये या आदेशाचे पालन न  करता रुग्णच दाखल करून घेत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे रुग्णांना उपचारासाठी मोठा आर्थिक भूर्दंड बसत आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल असा इशारा रुग्णालयांना दिला आहे. खाजगी रुग्णालयात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी समिती स्थापन कऱण्याची घोषणाही त्यांनी केली. याशिवाय शहरातील करोना उपचार केंद्र आणि विलगीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देशही त्यांनी पालिकेला दिले.
  यावेळी खासदार राजेंद्र गावित वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार रवींद्र फाटक,  जिल्हाधिकारी डॉ.  कैलास शिंदे, पालिका आयुक्त गंगाथरन डी, पोलीस अधीक्षक दत्तात्रय  शिंदे आदि उपस्थित होते.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें