सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदिंना पत्र..

मुंबई: राज्य सरकारने राज्यातील लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला असून लसीकरणासाठी स्वतंत्र अॅप विकसित करण्याची परवानगी द्यावी

Sudarshan MH
  • May 8 2021 8:46PM

मुंबई: राज्य सरकारने राज्यातील लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला असून लसीकरणासाठी स्वतंत्र अॅप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी महत्वाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकारने विकसित केलेले कोविन हे अॅप सुरळीत चालत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारचे स्वत:चे अॅप विकसित करण्याची परवानगी मागितली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी नुकताच संवाद साधला होता. त्यावेळी देखील त्यांनी कोविन अॅप व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार केली होती. कोविन हे अॅप व्यवस्थित काम करत नसल्याने लशीच्या लाभार्थ्यांना वेळेत लस घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे लसीकरणाच्या मोहिमेत विस्कळीतपणा देखील येत आहे. राज्य सरकारचे स्वत:चे अॅप विकसित झाल्यास त्याचा वापर राज्यातील जनतेकडून मर्यादित स्वरुपात होईल. यामुळे लसीकरणाची मोहीम देखील सुरळीत चालेल अशी अपेक्षा आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार