सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

“अनिल देशमुख ईडीच्या चौकशीसाठी आज हजर राहणार नाहीत”, वकिलांनी दिली माहिती

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरी इडीने शुक्रवारी छापे टाकले होते.

Sudarshan MH
  • Jun 26 2021 3:13PM


मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरी इडीने शुक्रवारी छापे टाकले होते. दिवसभर या छाप्यांमधून चौकशीचं काम झाल्यानंतर संध्याकाळी अनिल देशमुखांनी पत्रकारांशी बोलताना ईडीला पूर्ण सहकार्य करण्याची माहिती दिली होती. त्यापाठोपाठ आज सकाळी ईडीनं त्यांचे स्वीय सहय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना अटक केली. त्यानंतर अनिल देशमुख यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. समन्स नंतर अनिल देशमुख यांचे वकील ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता आणखी वेळ मागितला आहे.  कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने आज समन्स बजावले होते.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले होते. त्यावर त्यांच्या वकिलांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागणारा अर्ज सादर केला आहे. त्यावर ईडी या अर्जावर विचार करेल आणि नवीन तारीख देईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकशीला हजर राहण्यासाठी मागितला आणखी वेळ
“आम्ही ईडीला पत्र दिले आहे आणि कोणत्या प्रकरणाबाबत ही चौकशी सुरु आहे हे आम्हाला माहिती नाही. त्याची माहिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता ईडीने यावर निर्णय घ्यावा,” असे अनिल देशमुख यांचे वकील अ‍ॅड जयवंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार