सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा असून तो निर्णय रद्द करावा -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.8 - मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

Sudarshan MH
  • May 8 2021 8:39PM


   महाविकास आघाडी ही मागासवर्गीयांवर अन्याय करणारी आघाडी  आहे

मुंबई दि.8 - मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार च्या मंत्रिमंडळाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा.याबाबतच्या उपसमीतीने मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील 33 आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे.हा निर्णय त्वरित रद्द करून मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये 33 टक्के आरक्षण देणारा निर्णय त्वरित घ्यावा या मागणीचे  पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवीत आहोत अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  व्यक्त केली आहे.

 पदोन्नतीमधील मागासवर्गीयांच्या  33 टक्के राखीव जागा रद्द करणारा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकार चा मागासवर्गीयांविरोधी खरा चेहरा उघड झाला असून महाविकास आघाडी ही मागासवर्गीयांच्या विरोधातील आघाडी आहे असा आरोप 6 लाख मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी वर्गातून व्यक्त करण्यात येत असल्याचे रामदास आठवले म्हणाले. 

 सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांना  पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकार ला दिला आहे. त्यानुसार  याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने  दि. 20 एप्रिल 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये 33 टक्के जागा आरक्षित केल्या होत्या. मात्र मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्या नंतर  कोणतेही कारण नसताना राज्य सरकारने तडकाफडकी निर्णय घेऊन मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय जारी करणे हा मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे. या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध  करीत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. तमाम शासकीय मागासवर्गीय  कर्मचारी अधिकारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागासवर्गीयांच्या  पदोन्नतीमधील हक्काच्या 33 टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा शासन निर्णय त्वरित घ्यावा याबाबत आपण मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र पाठविणार आहोत असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार