सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाच्या बरोबरीने आता 'म्युकॉर्मीकॉसिस'चा आजाराचा धोका

मुंबई: कोरोना व्हायरसच्या बरोबरीने आता म्युकॉर्मीकॉसिस आजाराचा धोका निर्माण झाला आहे.

Sudarshan MH
  • May 8 2021 1:37PM


मुंबई: कोरोना व्हायरसच्या बरोबरीने आता म्युकॉर्मीकॉसिस आजाराचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उदहारणार्थ उत्तर महाराष्ट्र, विदर्भात म्युकॉर्मीकॉसिसचा आजार झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. म्युकॉर्मीकॉसिसच्या आजारामध्ये मृत्यूदर ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्युकॉर्मीकॉसिसला सध्या सुरु असलेल्या कोरोना साथीच्या आजाराचाच एक भाग समजले जाते. म्युकॉर्मीकॉसिसवर अँटी फंगल औषधे चालतात. या औषधांची आता कमतरता निर्माण झालीय, त्यावरुन आजाराची तीव्रता लक्षात येते. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर म्युकॉर्मीकॉसिसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली, त्यामुळे परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये म्युकॉर्मीकॉसिससाठी विशेष दवाखाना सुरु करण्यात आलाय. सध्या ग्लोबलमध्ये म्युकॉर्मीकॉसिस झालेले १८ रुग्ण दाखल आहेत. डोळे, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद नवलखे यांच्या मार्गदर्शनाखाली म्युकॉर्मीकॉसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ३१ रुग्णांना दाखल करण्यात आले, त्यातले २५ रुग्ण शहराबाहेरचे होते.

म्युकॉर्मीकॉसिसमध्ये अंधत्व येण्याची शक्यता असते. उपचार सुरु असलेल्या ग्लोबल रुग्णालयात सहा रुग्णांनी आपला वरचा जबडा गमावला असून एका रुग्णाला डोळ्याच्या बुबुळाला मुकावे लागले. परेलच्याच केईएम रुग्णालयात म्युकॉर्मीकॉसिसच्या २५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार