सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पंकजाताई मुंडेंनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*

..*अन् ती भेट अखेर राहूनच गेली !*

Abhimanyu
  • Nov 26 2022 7:41PM
मुंबई । दिनांक २६।
मराठी, हिंदी चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमातून आपल्या अभियनाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. माझा आणि त्यांचा फोनवर नेहमीच संवाद व्हायचा पण आमची भेट अखेर राहूनच गेली अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. 

   आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करतांना पंकजाताई म्हणाल्या, 'ज्येष्ठ अभिनेते, एक हरहुन्नरी असा कलाकार आज आपल्यात राहिला नाही, मी सन्माननीय विक्रम गोखले यांना मनापासून श्रध्दांजली, आदरांजली वाहते. अनेक वेळा त्यांचा मला फोन यायचा आणि फोनवर ते भरपूर गप्पा मारायचे. माझे ट्विट बघायचे, माझे स्टेटमेंट बघायचे, माझ्या भाषणांवर प्रतिक्रिया द्यायचे आणि बऱ्याच वेळा म्हणायचे, तुझा धाडसीपणा मला खूप आवडतो. इतकं भरभरून कौतुक एवढं मोठं यश मिळवलेल्या व्यक्तीकडून ऐकून मला खूप आनंद होत असे. मला एकदा असंच म्हणाले,  ' विक्रमकाकांना एकदा काॅफी प्यायला बोलवं, भरभरून गप्पा मारू ', पण ते राहूनच गेलं... त्यांच्या त्या बोलण्याची आठवण सदैव  होत राहिल. कठीण काळात एवढया मोठया व्यक्तीने दोन शब्दांचा दिलेला आधार सदैव माझ्या आठवणीत राहील. विक्रम गोखले हे एक असे अभिनेते आहेत, ज्यांना सिनेसृष्टी कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी प्रत्येक रोल ला एक डिग्निटी, उंची प्रदान करून दिली, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे व राहील.'
••••

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार