सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा उपक्रम

Abhimanyu
  • Sep 10 2022 9:37PM
मुंबई : गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे 400 सभासद एनसीसीमधील 1500 मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते.

गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेचे एन. बी. मोटे राज्य चिटणीस (अ.का.) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणमैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन स्काऊट्स आणि गाईड्स राज्य संस्थेच्या वतीने करण्यात येत असते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार