सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार

इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची विधानपरिषदेत माहिती

Abhimanyu
  • Aug 18 2022 10:00PM
मुंबई : बेरड, बेडर रामोशी समाजाचे प्रतीक असलेल्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या बानूरगड येथील समाधी परिसरात तसेच आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या हौतात्म्य पत्करलेल्या पुण्यातील ब्रिटीशकालीन स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

नियम 92 अन्वये सदस्य गोपीचंद पडळकर यांनी अर्धा – तास चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलत होते.

बेरड, बेडर रामोशी समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यासंदर्भात संबंधित विभागांची लवकरच बैठक घेऊन त्यामध्ये योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, महादेव जानकर, ॲड.अनिल परब यांनी सहभाग घेतला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार