सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत मुलांच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून दोन्ही मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १० लाख देण्यात येणार आहे.

Shruti Patil
  • Jun 25 2024 10:18AM
मुंबई: पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. 
 
यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल असे सांगितले. तसेच झालेल्या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असताना देखील ही केस नव्याने उघडून त्यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींवर लवकरात लवकर शासन व्हावे यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
आईबापाच्या हाताशी आलेली मुलं अचानक गेल्याने झालेल्या दुःखाची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या दोन्ही मृत मुलांच्या कुटूंबियांना पुन्हा सावरता यावे यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही शिंदे यांनी घेतला आहे.
 
पुण्यात झालेल्या या घटनेनंतर यातील दोषींवर कठोर कारवाई करून कुणालाही पाठीशी घालू नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा वेगाने तपास होऊन अनेक जणांना अटक झाल्याचे या दोघांच्या वडिलांनी आणि कुटूंबियांनी मान्य केले. तसेच आपल्याला भेटून आपले म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल आणि आपल्या मुलांसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार