सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रात महायुतीला वक्फ बोर्डाला १० कोटी देऊन मतं मिळतील का? महायुती सरकारला वक्फ बोर्डाची खुशामत करण्याची गरज का वाटली?

मुस्लिम मतांची सध्या खूप चर्चा आहे. त्यामुळे धास्तावलेल्या महायुती सरकारने मुस्लिमांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का? असा प्रश्न महाराष्ट्रातील हिंदू जनतेला पडलेला आहे.

Shruti Patil
  • Jun 13 2024 1:27PM

मुंबई: हिंदुत्ववादी सरकार म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिलेला आहे. वक्फ बोर्डाला १० कोटीचे अनुदान देण्याच्या निर्णयाविरोधात हा इशारा देण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला दारुण पराभव आणि मविआला मिळालेल्या घवघवीत यशाचे एक महत्त्वाचे कारण मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाले. मुस्लिम मतांची सध्या खूप चर्चा आहे. त्यामुळे धास्तावलेल्या महायुती सरकारने मुस्लिमांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का? असा प्रश्न महाराष्ट्रातील हिंदू जनतेला पडलेला आहे.

मुस्लिम मतदार महायुतीच्या विरोधात कशा प्रकारे एकवटला? याची ही फक्त झलक आहे. हेच धुळ्यात, दक्षिण मध्य मुंबईत झाले, हेच बीडसह त्या प्रत्येक मतदार संघात झाले जिथे मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मुस्लिमांनी हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधात फतवे काढून त्यांना मतदान करू नका, असे जाहीरपणे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांच्या समाजाने काम देखील केले. तरीही राज्यातील हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या महायुतीच्या सरकारने व बोर्डाला १० कोटींचे अनुदान का दिले? महायुती सरकारची असं करण्यामागे नक्की काय मजबूरी आहे? हा प्रश्न सर्वसामान्य हिंदूंच्या मनात निर्माण झाला आहे व त्यामुळे सकल हिंदू समाजात नाराजीचा सुर दिसत आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार