सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लेकाचं नाव 'जहांगीर'? कुटुंबाला ट्रोल केल्यावर चिन्मय मांडलेकर कुटुंबाचा संताप; पण हिंदू असून 'जहांगीर' नाव का?

मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यामुळे त्याने आता छत्रपती शिवरायांची भूमिक न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Shruti Patil
  • Apr 23 2024 8:04PM

मुंबई: मराठी मालिका, नाटक व चित्रपटांमधून अभिनेता चिन्मय मांडलेकर घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून हिंदू असून मुलाच्या ठेवलेल्या ‘जहांगीर’ नावावरून अभिनेत्यासह त्याच्या कुटुंबीयांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मय मांडलेकरने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याआधी सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

आजपर्यंत हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कोणत्याही कोणत्या ना कारणाने हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रपोगेंडा चालवल्या जात असल्याचे दिसते. हिंदू देवी - देवतांचा वेगवेगळ्या पात्रांमधून अपमान केला जात आहे. चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते वैयक्तिक आयुष्यात हिंदू असूनही इस्लामचे अनुकरण करताना दिसतात. त्यामुळे त्यांना मानणारा वर्गही त्याकडे आकर्षित होतो.

चिन्मय मांडलेकर ने हिंदू असूनही जहांगीर हे नाव मुलाचे ठेवल्याकारणाने सोशल मीडियावर त्याला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्या जात आहे. या लोकांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून एक संदेश त्यांच्या चाहत्या वर्गाला देत असतात. या ट्रोलिंगवर चिन्मय आणि त्याच्या पत्नीने व्हिडिओ बनवून उत्तर दिले आहे. चिन्मयने यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही असेही म्हटले आहे. त्याच्या या भूमिकेवर नेटकऱ्यांनी त्याला खडे बोल सुनावले आहे, की चिन्मय छत्रपतींची भूमिका साकारायला नाही म्हणतो आहे, परंतु जहांगीर नाव ठेवल्याचा त्याला कुठेही पश्चातापाचा लवलेशही नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार