सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज, उपचाराचा खर्च आम्ही करू; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. डाॅक्टर म्हणून माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर त्यांनी चांगला डॉक्टर बघावा आणि बिघडलेले मानसिक संतुलन ठीक करावे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Shruti Patil
  • Apr 16 2024 6:47AM

मुंबई: काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी चांगला डॉक्टर बघावा, उपचार घ्यावेत, त्याचा संपूर्ण खर्च आमच्या वैद्यकीय सहायक मंचाकडून केला जाईल, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. सध्या दररोज महाराष्ट्र बघतोय, त्यांची मानसिक स्थिती बिघडत आहे. माझा एक डॉक्टर म्हणून त्यांना सल्ला आहे. मानसिक संतुलन ढासळून न देता त्यांनी एक चांगला डॉक्टर बघावा आणि मानसिक उपचार करून घ्यावेत.

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीचा आर्थिक स्राेत शोधून या फाउंडेशनच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. याबाबत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन पानी पत्र पाठवून या संस्थेला मिळत असलेल्या मदतीची शहानिशा करून चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यावर खासदार शिंदे आपली प्रतिक्रिया दिली आहे

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेवून अनेक दिवसांपासून संयम ठेवलेले श्रीकांत शिंदे आधी उमेदवारी आणि त्यानंतर वारंवार होणाऱ्या टीकेमुळं संतापले आहेत. त्यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. संजय राऊत यांनी सोमवारी श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनवर गंभीर आरोप केले होते. त्याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार