सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीकांत शिंदे फाऊंडेशच्या घोटाळ्याची चौकशी करा – संजय राऊत

ठाण्यातील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मदाय आयुक्तांकडे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार केली आहे.

Shruti Patil
  • Apr 16 2024 6:41AM

मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्यात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण या प्रचार सभांमध्ये राज्यातील आणि त्यासोबतच देशातील भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनमध्ये घोटाळा झाला असल्याची तक्रार खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी या घोटाळ्यासंदर्भातील एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. त्यानंतर हे पत्र त्यांनी X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट केले आणि याबाबतची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात ५०० ते ६०० कोटींचा घोटाळा झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून आम्ही माहिती घेत आहोत. वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे व्यवहार, आर्थिक उलाढाल काय आहे? याची माहिती मागवली. व्यवहारांवरुन कोट्यवधींची उलाढाल करत आहेत हे लक्षात आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनचा वैद्यकीय कक्ष आहे. गणेश उत्सव स्पर्धेत कोट्यवधी रुपये वाटले, गणपतीत ६०० गाड्या बुक करण्यात आल्या, त्याचे पैसे कोणी भरले? कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. सरकारचे बाळराजे (श्रीकांत शिंदे) हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून चंदा दो आणि धंदा लो या माध्यमातून काम करत आहेत. यांचे ऑडिट, देणग्या देणाऱ्यांचा तपशील हे सगळे सातपुते यांनी मागितले आहे. मात्र धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत. त्यांना ही माहिती मिळत नाही, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार