सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत - अजित पवार

माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली...

Shruti Patil
  • Mar 29 2024 4:44PM
मुंबई (दि. २९ मार्च): शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारं, विधीमंडळात जोरदार आवाज उठवणारं निर्भिड नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मिनाक्षीताई पाटील यांचे संपूर्ण कुटुंबंच शेतकरी कामगार पक्षाशी जोडले गेले आहे. लहानपणापासूनच त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे संस्कार झाले. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन मोर्चे, आंदोलनं केली. त्यांचे जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होते. अलिबाग विधानसभेचे त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. सन 1999 साली तत्कालिन विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून त्या कार्यरत होत्या. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण रायगड जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या मिनाक्षीताईंच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाटील कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. माजी राज्यमंत्री मिनक्षीताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार