सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*रुग्णांची आर्थिक लूट थांबवा..डोंबिवलीच्या वंदना सोनवणे चे मुख्यमंत्र्यांना पत्र*

कोविड १९ ची रुग्णालये या गंभीर परिस्थितीचा फायदा घेत लाखोंची बिले बनवत आहेत असे पत्र डोंबिवलीतील नागरीक वंदना सोनावणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

Snehal Joshi
  • Jul 16 2020 12:11AM
डोंबिवली ( शंकर कोविड १९ ची रुग्णालये या गंभीर परिस्थितीचा फायदा घेत लाखोंची बिले बनवत आहेत असे पत्र डोंबिवलीतील नागरीक वंदना सोनावणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.जाधव ) कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले केल्यानंतर बिलाची आकडे पाहिल्यावर रुग्ण आणि नातेवाईकांनी ही आर्थिक लुट होत असल्याचा आरोप करत आहेत. ज्या रुग्णांचे कॅशलेश मेडिक्लेम असतात त्यांना मात्र बिलाची चिंता नसते. परंतु काही रुग्णांना लाखोची बिले भरताना नाकीनऊ येते. खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या बिलासंदर्भात कडक कारवाई करावी. कल्याण – डोंबिवलीतील कोविड १९ ची रुग्णालये या गंभीर परिस्थितीचा फायदा घेत लाखोंची बिले बनवत आहेत असे पत्र डोंबिवलीतील नागरीक वंदना सोनावणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. वंदना सोनावणे यांनी पत्रात म्हटले आहे कि, मुंबईत हे सर्व सुरळीत चालत असताना, कल्याण-डोंबिवलीत सध्याची परिस्थिती संपूर्णपणे हाता बाहेर जात असल्याचे दिसत आहे. महापालिका ते खाजगी रुग्णालय सर्वत्र कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. मुंबईला केलेल्या उपाययोजना जर कल्याण-डोंबीवली महापालिका व खाजगी परिक्षेत्रात करता आले, तरी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल सरकारी व गैरसरकरी, खाजगी लॅब चे कोविड टेस्टची दर नियमित करून जाहीर करावी. हे जरी जाहीर झालेलेले आहेत तरी अजून प्रत्यक्षात जास्त दर आकारण्यात येत आहेत, व पावती सुद्धा दिली जात नाही कल्याण-डोंबिवलीत सर्व कोविड इस्पिताळाची, एकूण उपलब्ध बेड संख्या दर्शवण्यासाठी ऑनलाइन डॅश बोर्ड करण्यात यावेत (सरकारी किंवा गैरसरकरी), कोविडचा संशय आल्या पासून ते कोविडपासून बरे होईपर्यत सर्व प्रोसिजर एका SOP (standard operating procedure) द्वारे जाहीर करावी. हे sop सर्व सरकारी/गैर सरकारी यंत्रणा व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करायला हवे.एक अडिशनल IAS ऑफिसर,  देण्यात यावं जो इस्पितालांची बिलिंग सिस्टीमवर लक्ष ठेवतील व आर्थिक भ्रष्टाचारावर आळा बसेल. खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या बिलासंदर्भात कडक कारवाई करावी.कल्याण – डोंबिवलीतील कोविड १९  ची रुग्णालये या गंभीर परिस्थितीचा फायदा घेत लाखोंची बिले बनवत आहेत.तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र दिले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार