सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय मजदूर संघाचे भूतपूर्व अखिल भारतीय उपाध्यक्ष व संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री. रामदासजी पांडे यांचे कोरोना निधन....

श्री. रामदासजी पांडे यांचे कोरोना मुळे आज सायंकाळी नागपूर येथे दुःखद निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

Sudarshan MH
  • Apr 22 2021 10:12AM

बॉक्स.... 
भारतीय मजदूर संघाचे भूतपूर्व अखिल भारतीय उपाध्यक्ष व संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री. रामदासजी पांडे यांचे कोरोना मुळे आज सायंकाळी नागपूर येथे दुःखद निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. 



मूळचे  सालई (गोधनी), नागपूर जिल्हा येथील असलॆले रामदासजी लहानपणा पासून संघाच्या संपर्कात आले. शिक्षणासाठी नागपूरला असतांना महाल संघ कार्यालयामध्ये त्यांचा निवास होता. १९६५ साली श्री गुरुजींनी त्यांना दत्तोपंत ठेंगडीची काळजी घ्यायला दिल्लीला पाठविले. तेव्हापासून ते भारतीय मजदूर संघाच्या कामाशी जुळले व पुढे मजदूर संघामध्ये प्रचारक या नात्याने त्यांनी विविध दायित्वांचे निर्वहन केले. उत्तर भारतामध्ये विशेष करून दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश , हिमाचल प्रदेश, पंजाब या प्रांतांमध्ये मजदूर संघाचे कार्य वाढविण्यात त्यांचे मुख्य योगदान होते. पुढे भारतीय मजदूर संघाचे ते अखिल भारतीय उपाध्यक्ष सुद्धा राहिले. . 

दत्तोपंत ठेंगडींच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते सोबत होते. दत्तोपंतांच्या साहित्य निर्मिती मध्ये त्यांचे मोठे योगदान होते. यामध्ये Third Way, समग्र दर्शन, संकेत रेखा इत्यादी ग्रंथ संपदा आहे. 

मागील काही महिन्यांपासून त्यांचा नागपूरला निवास होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा  संसर्ग झाला व यामुळे त्यांचे दुःखद निधन झाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार