सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*शुभसंकेती पर्वणी*

स्पर्धा हा निव्वळ शब्द नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा’, या भावनेशी नाते सांगणारा आहे. त्यामुळे ‘स्पर्धा परीक्षा’ या शब्दातच ‘दम’आहे.

- रमेश कुलकर्णी ९९२२९०१२६२
  • Jul 11 2020 7:26PM
स्पर्धा हा निव्वळ शब्द नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा’, या भावनेशी नाते सांगणारा आहे. त्यामुळे ‘स्पर्धा परीक्षा’ या शब्दातच ‘दम’आहे. लाखो तरुण-तरुणींना ध्येयासमीप नेणारे साधन आहे. इच्छुक परीक्षार्थींच्या हृदयाचे ठोके वाढविणारा अद्वितीय शब्द आहे. पद, प्रतिष्ठा व पैसा मिळवून देणारा महत्त्वाचा घटक आहे. स्पर्धा परीक्षेच्या मोहिनीने अनेकांच्या आयुष्याची होळी केली तर अनेक गुणवंतांनी दिवाळी साजरी करण्याचे दाखले आपल्या आसपास बघायला मिळतात. बेरोजगार युवक-युवतींच्या स्वप्नांना भरारी देणारा ‘स्पर्धा परीक्षा’ हा असा भारदस्त प्रवास आहे. आयुष्याला नाट्यमय कलाटणी देण्याची ताकद या प्रवासाची आहे. आयुष्याला समृद्ध व संपन्न करण्याचा ‘रोड मॅप’ देणारा हा गतिमान शब्द आहे. पर्वणी रवींद्र पाटील.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिलांमधून राज्यात प्रथम आलेली विदर्भकन्या. हर्षा व रवींद्र पाटील या उदात्त विचारसरणीच्या शिक्षक दाम्पत्याला मुलीच्या जन्मासमवेत प्राप्त झालेली ही आनंद ‘पर्वणी’. अमरावती जिल्ह्यातील कुष्टा (पथ्रोट) या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आज उपजिल्हाधिकारीपदापर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रखर इच्छाशक्ती व प्रचंड संघर्षवृत्ती हेच यशाचे ब्रीद. आतापर्यंत दोनदा उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहोचविणारी अलौकिक बुद्धिमता. योग्य नियोजन, आत्मविश्वास व मेहनत हीच यशोशिखरावर नेणारी त्रिसूत्री. ग्रामीण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरावी, अशी ही ‘टॉपर’ यशोगाथा आहे. मागास भागातील विशेषत: विदर्भ व मराठवाडा येथील इच्छुक परीक्षार्थींना दिलासा व प्रोत्साहन देणारी ही प्रेरक कहाणी आहे. ‘हे प्रत्येकाला शक्य आहे़’ हा यशोमंत्र मनामनांत रुजविणारी व आनंद द्विगुणित करणारी शुभसंकेती स्टोरी आहे. त्यामुळेच यशाची ही आनंद ‘पर्वणी’ इतरांसाठी अनुकरणीय ठरते. ग्रामीण महाराष्ट्रातील युवक- युवतींना या ‘पर्वणी’ यशामुळे मोठे पाठबळ मिळणार आहे. त्यांच्यातील आत्मविश्वासाला उभारी देणारी ही ‘पर्वणी’ यशोगाथा त्यामुळेच तिची एकटीची न ठरता सांघिक हिताची ठरते. प्रत्येक परीक्षार्थीचे मनोबल उंचावणारी ही गोष्ट आहे. आपल्या कर्तृत्ववान गुणवंत लेकीचा अजाणतेपणे हिरमोड करण्याचा प्रयत्न झाला. परंतु विनाकारण मनस्ताप देणाºया ‘ट्रोलर’ जमातीसाठीही शुभचिंतन करणाºया या ग्रामीण लेकीचे यश म्हणूनच आगळेवेगळे ठरते. संयम, जिद्द, परिश्रम, चिकाटी, इच्छाशक्ती व सकारात्मकवृत्ती या षट गुणांच्या विश्वासावर षटकार मारून यशाला गवसणी घालणारी ‘डेप्युटी कलेक्टर पर्वणी पाटील’ म्हणूनच भूषणावह आहे. आगामी परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे परीक्षार्थींचा गमावलेला उत्साह परत आला आहे. नैराश्य व मरगळ दूर होण्यास मदत झाली. यापूर्वी कोरोनाष्टकाने परीक्षार्थींचे वेळापत्रकच बिघडवून टाकले होते. आपले घरदार सोडून परीक्षेच्या तयारीला शहरी गेलेली ही पाखरे परत घराकडे वळली होती. घरात अभ्यास करताना नाना समस्या व अडचणींना सामोरे जावे लागले. संकटाची मालिकाच अनुभवली गेली. लक्ष विचलित होण्यास पूरक असणाºया गोष्टी मध्यंतरीच्या काळात अनेक घडल्या आहेत. या सर्व गोष्टीत फार अडकून न पडता परीक्षार्थींनी मिळालेला अधिकचा वेळ सदुपयोगी लावला पाहिजे. त्याकरिता योग्य नियोजन व परिश्रमाची गरज आहे. सकारात्मक पद्धतीनेच यशोशिखर गाठता येते, हेच वास्तव आहे. नकारघंटा दूर सारली पाहिजे. जागा कमी व इच्छुक भरपूर त्यामुळे स्पर्धा मोठीच असणार. अथक परिश्रम व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बाजी मारण्याची धमक अंगी बाळगावीच लागेल. नशिबाला फार दोष देत बसू नका. आपली शोधक अभ्यासूवृत्तीच आपल्याला यातून तारणार आहे. अपयशाला फार घाबरण्याची गरज नाही. अपयशालाच आपला महागुरू बनवा. त्यामुळे यशाचा राजमार्ग हा अधिक प्रशस्त व विलोभनीय ठरतो, यात मात्र कुठलीच शंका नाही. जाता जाता : ठाकरे सरकार बेरोजगार तरुण- तरुणींसाठी ‘महाजॉब्स’ ही मॅग्नेटिक योजना घेऊन आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. सक्षम मनुष्यबळ व रोजगाराच्या अनेक महासंधी निर्माण करणारा हा सरकारी उपक्रम आहे. उद्योजक व जॉब शोधणाºयांमधील महाजॉब्स हा ‘महादुवा’असल्याचा दावा करण्यात आला आहे. बेरोजगारांसाठी मोठी सुवर्णसंधी व आश्रयस्थान निर्माण करणारे हे पोर्टल ठरावे. अल्पावधीत त्याला मिळालेला भव्य प्रतिसाद वास्तवाचे दाहक दर्शन घडविणारा आहे. योग्य नियोजनाने यातून भूमिपुत्रांना न्याय मिळेल, अशी आशा आजतरी करण्यास हरकत नाही. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार