सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राम मंदीर निर्माण कार्य साठी मावळ तालुक्यामधून एक करोड पेक्षा जास्त निधी संकलन होईल: आमदार सुनिल शेळके

आमदार सुनिल शेळके

Sudarshan MH
  • Jan 24 2021 6:54AM
 
प्रतिनिधि: दिपक चव्हाण पुणे
 
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या नगरी म्हदे भव्य राम मंदिर निर्माण कार्यास प्रारंभ झाला आसुन राम मंदिर निमार्ण कार्या साठी निधि संकलन अभियान देशभरात चालू आहे ह्या अभियान म्हदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,समेत साधु संत मंहत, वारकरी संप्रदाय व सर्व हिंदू संघटना द्वारा निधि संकलन कार्य सुरू आसुन आज मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांनी निधि संकलन अभियान म्हदे आपला सहभाग नोंदवत राम मंदीरा निर्माण कार्या साठी दहा लक्ष रूपया चा धनादेश समर्पित केला
 
या वेळी आमदार सुनिल शेळके 
म्हणाले की आयोध्या येथे प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्य होत आहे.श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर म्हणजे भारतीय मनाची शाश्वत प्रेरणा आहे. श्रीराम जन्मभूमीत भव्य मंदिर बनण्याबरोबरच जनतेच्या हृदयात श्रीराम आणि त्यांच्या जीवन मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी,या अनुषंगाने सर्वात मोठ्या निधी समर्पण अभियानाची सुरुवात झाली आहे संपूर्ण जगभरातून प्रत्येकजण अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. या पुण्ययज्ञात दहा लक्ष रुपये समर्पित करुन मला सुद्धा या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले याचा अभिमान आहे.ह्या भव्य राम मंदीर निर्माण कार्य साठी मावळ तालुक्यामधून एक करोड पेक्षा जास्त निधी संकलन होईल अशी अपेक्षा यावेळी आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली  
 
 
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, जि.प.सदस्य, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती बाबुराव वायकर, धनाजीराव शिंदे कार्याध्यक्ष विश्व हिंदू परिषद, प्रदीप शामराव देसाई जिल्हा सहसंयोजक, संतोषभाऊ भेगडे पाटील सहसंयोजक अभियान, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, रमेशजी लोणकर पुणे जिल्हा निधीप्रमुख, ह.भ.प. गोपीचंद महाराज कचरे अध्यक्ष बजरंग दल, संदेश भेगडे संयोजक बजरंग दल, अमित भेगडे, महेंद्र असवले, अमोल पगडे व इतर मान्यवर उपस्थित होते....

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार