सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मोहन रायभान; नंदुरबार शहराध्यक्षपदी नितीन जगताप

नंदुरबार शहराध्यक्षपदी नितीन जगताप

Nandurbar MH
  • Nov 25 2020 6:00PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी आज नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. नुकतेच राष्ट्रवादीत आलेले उदेसिंग पाडवी यांच्या समर्थकांना अधिक जागा देऊन आणि माजी आमदार शरद गावित यांच्या समर्थकांना हटवून नवी रचना करण्यात येत असल्याचे संकेत जणू राष्ट्रवादी पक्षाने दिले आहेत. 
     आज डॉक्टर अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी कार्यकारिणी घोषित केली. जुन्या कार्यकारिणीतील कोणतेही पद या पुढे अधिकृत मानू नये. ज्यांची नावे वरिष्ठांकडून फायनल झाली ती जाहीर करीत आहोत. तथापि अन्य काही पदांवरील रस्सीखेच चालू असल्यामुळे ती नावे नंतर जाहीर करण्यात येतील, अशी माहिती डॉक्टर मोरे यांनी याप्रसंगी दिली. जाहीर केलेल्या नावांमध्ये माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या शहादा तळोदा विधानसभा मतदार संघातील समर्थकांचाच समावेश मोठ्याप्रमाणात आहे. दोन महिन्यापूर्वी अजित दादा पवार यांच्या खास मर्जीतील डॉक्टर अभिजीत मोरे यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. एक महिन्यापूर्वी एकनाथराव खडसे यांचे खास समर्थक असलेले माजी आमदार उदेसिंग पाडवी यांना जिल्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन विशेष अधिकार देण्यात आले. या पाठोपाठ आता जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. 
दरम्यान नव्या घोषणेनुसार चार उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. त्यात शांतीलाल साळी, शहादा, भीमसेन पाडवी, भिमसिंग पाडवी धडगाव, रामसिंग आघाडे तळोदा, आणि मोहन माळी नंदुरबार यांचा समावेश आहे. नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, तळोदा शहराध्यक्ष चंद्रकांत भोई तर नंदुरबार तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील शहादा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील तळोदा तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत याप्रमाणे नवनियुक्ती घोषित करण्यात आली. अन्य पदाधिकारी असे-

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार