सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

असा सल्ला देण्यात काय चुकीचे आहे ?केंद्रमंत्री शेखावत

देश आणि जगात कोट्यवधी लोक बालाजीचे भक्त आहेत.

Senhal Joshi MH
  • Apr 28 2021 5:36PM


बॉक्स... 
देश आणि जगात कोट्यवधी लोक बालाजीचे भक्त आहेत. जर मी नारळ वहाण्यास सांगितले, तर त्यात मी निष्क्रीय आणि दायित्वशून्य कसा ठरू शकतो ?

बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल, असा सल्ला जोधपूर येथील एका रुग्णालयात कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना दिल्याने केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर टीका होऊ लागली आहे. त्यावर शेखावत यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.
शेखावत यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, डॉक्टर त्यांचे काम करत आहेत. बालाजीवर श्रद्धा ठेवा आणि नारळ वहा, असा सल्ला देण्यात काय चुकीचे आहे ? राजस्थानमध्येच नाही, तर देश आणि जगात कोट्यवधी लोक बालाजीचे भक्त आहेत. जर मी नारळ वहाण्यास सांगितले, तर त्यात मी निष्क्रीय आणि दायित्वशून्य कसा ठरू शकतो ? रुग्णालयात भरती असणार्‍या रुग्णाच्या नातेवाइकांना मानसिक आधार देणे चुकीचे आहे का? घाबरलेल्या रुग्णाच्या आईच्या मनाला शांती मिळावी म्हणून तिला आधार देणे, तसेच औषधांसमवेत प्रार्थनाही कामी येतील, हे सांगायचे काम मी केले. डॉक्टरांकडून मिळणार्‍या उपचारांच्या संदर्भात मला काहीही शंका नसून ते त्यांचे दायित्व अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार