सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एक ढूंढो मिलते हजार..!! ६ कोटी रूपयाचा चूना लावून शब्बू फरार...

त्याने आपल्या जाळयात काटोल मधील, डॉक्टर, वकील, राजकारणी, व्यापारी, अधिकारी तसेच कर्मचारी याना ओढले. २० लोकांची एक याप्रमाणे त्यांचेकडे सुमारे २० भिशी सुरु झाल्या

Snehal Joshi .
  • Aug 4 2020 12:57PM
मागील काही वर्षात काटोल शहरात आर्थिक भिशी चालवणाऱ्याचे पेव फुटले होते. सर्वात प्रथम शहरात *प्रकाश* ने मोठ्या प्रमाणात भिशी सुरु केली. त्याला *सज्जु, शब्बू व बुंड्रा* हे साथ देत होते. ही भिशी बोली-भिशी होती. म्हणजे जो सभासद जास्त पैसे देईल त्यास त्या महिन्याची भिशी मिळायची. ऐका भिशीत सुमारे २० सदस्य ठेवायचे, महीना रु २५,०००/- प्रमाणे २० लोकांचे ५ लक्ष रुपये जमा व्हायचे, या रकमें करीता जो सर्वाधिक बोली बोलेल त्याला ती रकम द्यायची. म्हणजे एखाद्या सदस्याने जर १ लक्ष रुपये बोली बोलली तर त्यास ४ लक्ष रुपये मिळायचे, शिल्लक १ लक्ष रुपये सर्व सदस्य वाटून घ्यायचे. अश्या प्रकारे भिशी चालायची. प्रकाशची भिशी जोरात चालली होती. शब्बू, सज्जू, बुंड्रा ने काटोल मधील अनेक प्रतिष्ठित लोक आपल्या जाळयात ओढून भिशीत सहभागी केले होते. जवळ पास १०० सदस्य झाले होते. २ वर्षाने या त्रयीतील *सज्जू* ने काही रकमें चा घोटाळा केला, त्यामुळे लोकांची रक्कम अडकली, त्यावेळी प्रकाशने आपली काही संपत्ती विकून लोकांचे पैसे दिले व भिशी बंद केली. याचा फायदा *शब्बू* ने घेतला. त्याने सज्जू व बुंड्रा यास बाहेरचा रस्ता दाखवला व एकटाच भिशी चालवू लागला. तो पर्यंत त्यास काटोल मधील कोणाकडे जास्तीचा पैसा व कोण लोभी आहेत हे माहित झाले होते. त्याने आपल्या जाळयात काटोल मधील, डॉक्टर, वकील, राजकारणी, व्यापारी, अधिकारी तसेच कर्मचारी याना ओढले. २० लोकांची एक याप्रमाणे त्यांचेकडे सुमारे २० भिशी सुरु झाल्या, म्हणजे शब्बू ची मासिक उलाढाल १ कोटी रूपयाची होती. मेख म्हणजे प्रत्येक भीशीत शब्बू असायचा व प्रथम भिशी कोणतीही बोली न लावता त्यास मिळणार असा नियम त्याने तयार केला होता, व या नियमास काटोल मधील कायदे पंडितानी समत्ती दिली होती. म्हणजे कुठली ही रक्कम न लावता त्यास भिशी ची पूर्ण रक्कम मिळत होती. यालाच म्हणतात "बिन भांडवली धंदा". सकाळी उठयाचे स्कूटरवर गावात फिरूंन पैसे गोळा करायचे हा शब्बू चा नित्यक्रम झाला होता. आता त्याची ओळख गावभर झाली होती. त्यातूनच त्याने सावकारीचा नवीन व्यवसाय सुरु केला. म्हणजे श्रीमंत लोकाकडून मासिक ३% व्याज दराने रक्कम घ्यायची व गरजुना ती ५% ते १०% व्याज दराने द्यायची, २% ते ७% त्यांचे कमीशन असायचे. शब्बू च्या या योजनेत अनेक प्रतिष्ठित लोकांनी आपला काळा पैसा गुंतविला. काटोल मधे शब्बू बँक जोरात सुरु होती. लोक त्याचेवर राष्ट्रीयकृत बँक पेक्षा जास्त विश्वास ठेवीत होते, त्याचे कडे पैसा गुंतविन्याची चढाओढ लागली होती. काटोल मधील तरुण डॉक्टर्स, व्यापारी, वकील आय-कर वाचविन्या साठी शब्बू कडे त्यास आमंत्रण देवून पैसा गुंतवीत होते. एक न.प. कर्मचारी ज्याचा पगार मासिक २५,०००/- आहे तो शब्बू कडे महीना १ लक्ष गुंतवित होता. कोणी १ नाही तर ४-५ भिशीत भाग घेत होते. शब्बू ऐका वर्षात रक्कम दाम-दुपट्ट करून द्यायचे आमिष देत होता. हाच शब्बू जर एखाद्या बाँकेत कर्ज मागण्यास गेला असता तर दारवानने त्यास हाकलुन लावले असते, इतका तो फटका होता. तोच आज काटोल मधे लाखो रुपये कर्जाने वाटीत होता. तो रोज दवाखान्यात, दुकानात व कोर्टतात दिसायचा. एक दिवशी सहज त्यास विचारले होते, "क्यों शब्बू कैसा चल रहा है"?? त्यांचे उत्तर होते, "भैय्या एक ढूंढो हजार मिलते"... शब्बू अतिशय व्यहारिक होता, तो दर महिन्यात ठराविक रक्कमेचे सोने विकत घेत असे व त्यावर बँक/सोसायटी मधून अल्प कर्ज घेत होता, सोने सुरक्षित ठेवन्याचा त्याने नवीन मार्ग शोधला होता. असा शब्बू संधीची वाट पहात होता, ती त्यास लॉकडावून ने दिली... "पैसा जाम हुवा है, जल्दी देता हूँ" असे म्हणत त्याने 4 महीने काढले व दि २८ जुले रोजी सर्व सोने व नगदी रक्कम घेवून काटोल मधून पो-बारा केला. जाणकार सांगतात काटोल सोडताना त्यांचे जवळ सुमारे ४ कोटी रूपयाचे सोने व २ कोटी नगदी रक्कम होती. त्यांच्या भाडयाच्या खोलीत त्याची पत्नी व छोटा मुलगा आहे सतत रडत आहेत, त्याना ही त्याचा पत्ता माहित नाही. बिचारे गुंतवणूकदार मोठ्या आशेने त्याची वाट पहात आहेत. शब्बू च्या फरार होण्याने काटोल मधील श्रीमंत व नंबर 1 च्या लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते म्हणतायत, "क्या ले के गया, ५ लाख याने महीनाभर की कमाई ले गया, कमा लेंगे" पण खरा मार पडलाय इमांनदारीने पैसे कमवीणाऱ्या लोकांना, ज्यानी आपल्या मूली च्या लग्ना साठी, घर बांधन्या साठी पैसा गुंतवीला होता, त्यांचा घामाचा पैसा घेवून शब्बू फरार झालाय. बाकी काटोल मधील उच्च शिक्षित समाजातील प्रतिष्ठित लोकांना शब्बू ने व्यवस्थित चुना लावलाय, शब्बू म्हणाला ते खरेच.... "एक ढूंढो मिलते हजार"...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार