सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मेळघाट परत एकदा अघोरी कृत्याच्या विळख्यात, 27 दिवसाच्या बालकावर प्रयोग....

चिखलदरा तालुक्यातील असलेले बारूगव्हाण या आदिवासी खेड्यात 27 दिवसांच्या कोवळ्या बालकास सराटयाने चटके देण्याचा प्रकार 19 जून ला उघडकीस आला आहे.

Snehal Joshi .
  • Jun 21 2020 2:39PM
अमरावती जिल्ह्यातील मेघात आदिवासींच्या अघोरी कृत्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. चिखलदरा तालुक्यातील असलेले बारूगव्हाण या आदिवासी खेड्यात 27 दिवसांच्या कोवळ्या बालकास सराटयाने चटके देण्याचा प्रकार 19 जून ला उघडकीस आला आहे. अलीकडच्या काही दिवसात मेळघाट अंधश्रद्धेच्या माध्यमातून तसेच अघोरी कृत्य सातत्याने घडत असून ही घटना याच आठवड्या तील तिसरी आहे. चिखलदरा तालुक्यातील बारूगव्हाण येथील सुनीता दिलीप चिमोटे हिला 27 दिवसांपूर्वी बाळ झाले होते. या बाळाचे पोट फुगत असल्यामुळे भुमकाला (मांत्रिक) बोलावण्यात आले. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार 27 दिवसांच्या या बाळाला गरम चिमट्याने डागण्या देण्यात आल्या. त्यामुळे या बालकाची प्रकृती खालावली. ही बाब गावातील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकेला कळल्यानंतर त्यांनी त्याची माहिती लगेच भरारी पथकाला दिली. भरारी पथक डॉ. आदित्य पाटील यांनी तक्रारीची दखल घेऊन घटनास्थळ गाठले व त्यानंतर या बालकाला चिरणी प्राथमिक स्वास्थ्य केंद्रला भरती करून घेतले. या दरम्यान या घटनेची माहिती डॉक्टर पाटील यांना चिखलदरा पोलिसात दिली. सदर प्रकरणी पोलिसांनी आठ महिन्यांच्या बाळाला डागण्या दिल्याच्या प्रकरणातून गावातील दायी झनका कासदेकर व बालकाचे वडील संजू तोटा यांना अटक केली आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार