जिल्हा दौरा ; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केल्या विविध सूचना
नंदुरबार जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस दलाने सज्ज आणि सतर्क राहून कामकाज करावे अशा सूचना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी दिल्या.
मंगळवारी डॉ. शेखर हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांनी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांची बंदद्वार बैठक घेतली. यात त्यांनी गणेशोत्सव तसेच आगामी सणांच्या.
काळात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर डॉ. बी.जी. शेखर यांच्याहस्ते नंदुरबार तालुक्यातील बिलाडी येथील खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333