सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चिरंगवाडीच्या जंगलात नीलगायीची शिकार...शिकार्‍यांचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपीवर कारवाई करून कोर्टात हजर करण्याऐवजी दिले परस्पर सोडून *वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेभळट धोरनामुळे खचत आहे कर्मचाऱ्यांचे मनोबल

Sudarshan MH
  • Feb 4 2021 9:04AM
 
 
 
 
 
*यामागचे गौडबंगाल काय?ते चौकशीअंती कळेल
 
*आरोपींना परस्पर सोडून देणार्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे
 
उमरखेड दि.3 (अरविंद जाधव)
 
उमरखेड येथील वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पोफाळी राऊंड मधील चिरंगवाडीच्या जंगलात निलगायची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला. गोपनीय माहितीच्या आधारे घटनास्थळावर पोहोचलेल्या क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांच्यावर शिकार्‍यांनी हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी पोफाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे वन कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या त्या आरोपींना उमरखेड येथील कार्यालयात पकडून आणले असता वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी परस्पर सोडून दिल्याच्या प्रकाराने वन वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिरंगवाडी जंगल परिसरात निलगायीची शिकार झाल्याची माहिती वनरक्षक राजू सुतारे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी क्षेत्र सहाय्यक संतोष संघई यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर दोघेही घटनास्थळावर गेले असता त्याठिकाणी निल गायीचे पाय, कातडे, मांस आढळून आले. तसेच शंभर मीटरवर शिकारी मटण शिजवत असल्याचे दिसून आले. याघटनेचा पंचनामा करत असताना तेथे उपस्थित आरोपींनी कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले.
याबाबतची माहिती वनरक्षक सुतारे आणि शेत्र सहाय्यक संघई यांनी पुसद येथील फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांना दिली. यावेळी फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी निमकर यांचेसह त्यांची चमू घटनास्थळी तत्काळ दाखल झाला, आणि आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांना घेऊन उमरखेड वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणले. ही घटना गंभीर असताना देखील उमरखेड वनपरिक्षेत्राधिकारी यांनी या आरोपींना न्यायालयात हजर न करता संशयित म्हणून सोडून दिले. जीवाची पर्वा न करता वनकर्मचाऱ्यांनी आरोपींना पकडले असताना देखील त्यांना सोडून देण्यात आल्याने याबाबत वन खात्याच्या वर्तुळात विविध चर्चेला पेव फुटले आहेत.   
याबाबत वनकर्मचारी राजू सुतारे यांनी पोफाळी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गजानन मारुती चीरंगे व बोधकर यांच्यासहीत अज्ञात आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार कैलास भगत करत आहेत.
चिरंगवाडी येथे घडलेल्या घटनेचा पी. ओ. आर. फाडण्यात आला असून वन कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची फिर्याद पोफाळी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. आरोपी हे मारहाण प्रकरणातील असून वनकर्मचाऱ्यांच्या जबाबानंतर शिकार प्रकरणातील संबंधितावर गुन्हे दाखल करून वनविभागांतर्गत कारवाई करण्यात येईल. मारहाण करणारे आरोपी संशयीत असून त्यांना तपासादरम्यान हजर राहण्याचे आदेश देऊन सोडून देण्यात आले. या असल्या प्रकारामुळे वनविभागातील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत जात असल्याचे दिसून येत आहे. आपले कर्तव्य बजावून जीवाची पर्वा न करता आरोपीला पकडून आणून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्या आरोपी शिकारीला वरिष्ठ अधिकार्‍याकडून अभय मिळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी करावे तरी काय? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. जोपर्यंत भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार नाही तोपर्यंत कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची अशीच हेळसांड हो त राहणार हे शाश्वत सत्य आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार