*माता रमाबाई आंबेडकर, वरळी स्मशानभूमी येथील जलवाहिनीचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोकार्पण*
माता रमाबाई आंबेडकर, वरळी स्मशानभूमी येथे पर्यावरण मंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पूर्ण करण्यात आलेल्या ५७
माता रमाबाई आंबेडकर, वरळी स्मशानभूमी येथे पर्यावरण मंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पूर्ण करण्यात आलेल्या ५७ इंचाच्या मुख्य जलवाहिनीचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून आज दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार पडले.
प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते माता रमाबाई आंबेडकर, वरळी स्मशानभूमी येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच माता रमाबाई आंबेडकर यांच्या अर्धपुतळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बेस्ट समिती अध्यक्ष श्री.आशिष चेंबूरकर, माजी आमदार श्री. सुनील शिंदे, जी/ दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष श्री. दत्ता नरवणकर, जल अभियंता श्री. अजय राठोर, सहाय्यक अभियंता श्री.जीवन पाटील,
श्री.अभिजित पाटील,संकेत सावंत उपस्थितीत होते.
माता रमाबाई आंबेडकर, वरळी स्मशानभूमी येथील विद्युत दाहिनी पाण्याच्या कमतरतेमुळे रात्री ८ वाजल्यानंतर बंद करावी लागत होती. पर्यावरण मंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार ५७ इंचाच्या मुख्य जलवाहिनीतून २४ तास सुरू असणारा पाणीपुरवठा वरळी स्मशानभूमीला देण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याअभावी अंत्यसंस्काराचा होणारा खोळंबा दूर होण्यास मदत होणार आहे.
तरी, परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प