सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ऑटो रिक्षावर झाड पडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या मारुती काळे यांच्या वारसास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तत्काळ चार लाखाची मदत केली

मारुती काळे हे ऑटोचालक होते .ऑटो भाड्यातून मिळालेल्या पैशावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांना एकूण पाच अपत्य असून मुलगी पदवीधर आहे अन्य अपत्य शिक्षण घेत आहेत. 22 जुलै रोजी नेहमीप्रमाणे मारुती ऑटो घेऊन शहरात गेले होते. दरम्यान त्यांच्या आटोवर गुलमोहराचे झाड कोसळले व हा अपघात त्यांच्या जीवावर बेतला. घरातील कर्ती अन कमावती व्यक्ती अशी अकाली गेल्याने मारुती यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले

s.ranjankar
  • Aug 2 2021 3:15PM
लातूर:ऑटो रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या मारुती काळे यांच्या वारसास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तत्काळ चार लाखाची मदत केली असून सामाजिक कार्यकर्त्या तथा  भाजयुमोच्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांनी केलेल्या प्रयत्न  अन पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.  या मदतीने त्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून त्यांनी प्रेरणा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मारुती काळे हे ऑटोचालक होते .ऑटो भाड्यातून मिळालेल्या पैशावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांना एकूण पाच अपत्य असून मुलगी पदवीधर आहे अन्य अपत्य शिक्षण घेत आहेत. 22 जुलै रोजी नेहमीप्रमाणे मारुती  ऑटो घेऊन शहरात गेले होते. दरम्यान त्यांच्या आटोवर गुलमोहराचे झाड कोसळले व हा अपघात त्यांच्या जीवावर बेतला. घरातील कर्ती  अन कमावती व्यक्ती अशी अकाली गेल्याने मारुती यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले .आपले अन आपल्या मुलाबाळांचे कसे होईल?  या प्रश्नाने मारुती यांच्या पत्नीचे अवसान गळाले. दरम्यान या कुटुंबाची भाजयुमोच्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांनी भेट घेतली व त्यांना मानसिक आधार दिला. या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळणे अतिशय गरजेचे होते हे ओळखून प्रेरणा यांनी थेट मनपा आयुक्तांची भेट घेतली व त्यांना या कुटुंबा वरील आपबिती सांगून त्यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी निवेदन दिले .आयुक्तांनीही ही बाब मानवता केंद्रस्थानी ठेवून गांभीर्याने घेतली व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांना मदतीसाठी विनंती केली. जिल्हाधिकार्‍यांनी सामाजिक बांधिलकीने या विनंतीचा आदर करीत चार लाख रुपये मंजूर केले व मदतीचा धनादेश मारुती यांच्या परिवारास तातडीने देण्यात आला. आपल्या भगिनीने केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे अवघ्या सात दिवसात मिळालेली ही मदत स्वीकारताना मारुती यांच्या पत्नीसह त्यांच्या  चीला  पिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार