अखेर शहिद गणेश नथू शेळके सि आर पि एफ चे जवान यांच्यावर त्यांच्या मुळ गावी मोरचंडी तालुका उमरखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
परंतु अंत्यसंस्कारासाठी तालुक्यातील प्रशासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची अनुपस्थिती
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मोरचंडी येथील रहिवासी शहीद गणेश नथू शेळके हे सीआरपीएफचे जवान आसाम मध्ये कार्यरत असताना शहीद झाले त्यांचा पार्थिव देह आसाम येथून विमानाने नागपूर येथे आणण्यात आला आणि शासकीय वाहनाने नागपूर येथून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या त्यांच्या मुळ गावी मोरचंडी येथे आणण्यात आला असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी शेजारी असलेल्या संपूर्ण गावातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मोरचंडी गावातुन शहिद गणेश शेळके यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.गणेश शेळके अमर रहे असे नारे देत संपूर्ण परीसर भाऊक झाले होते
या अंत्यसंस्कारासाठी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेव ससाने , उमरखेड पंचायत समितीचे सदस्य धनराज तगरे , ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशनचे तालुका अध्यक्ष शेषराव इंगळे, बिटरगाव पोलीस स्टेशन चे कर्मचारी, मोरचंडी येथील तलाठी यांच्या सह हजारों गावकरी उपस्थित होते.पंरतु राजकीय पुढारी व मोठ्या अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले त्यामुळे गावातील जनता या पुढार्यांवर आणि अधिकाऱ्यावर नाराज झाल्याचे गावकरी सांगत होते
प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प