सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आज ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज 6 डिसेंबर 2020 निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

MH today
  • Dec 6 2020 10:33PM
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज 6 डिसेंबर 2020 निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या अनेक भूमिकांमध्ये काम केले. रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास 150 हून अधिक नाटक तर 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या सर्वच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक हे नाटक केले. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते. रिझर्व्ह बँकेत नोकरी रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली. वयानुसार येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला. त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला. त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला. रवी पटवर्धन यांची काही गाजलेली नाटक अपराध मीच केला आनंद (बाबू मोशाय) आरण्यक (धृतराष्ट्र) एकच प्याला (सुधाकर) कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान) कोंडी (मेयर) जबरदस्त (पोलीस कमिशनर) प्रेमकहाणी (मुकुंदा) बेकेट (बेकेट) भाऊबंदकी मला काही सांगायचंय (बाप्पाजी) मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस) विकत घेतला न्याय (सिटी पोलीस ऑफिसर) --> रवी पटवर्धन यांचे चित्रपट  अंकुश (हिंदी) अशा असाव्या सुना उंबरठा दयानिधी संत भगवान बाबा ज्योतिबा फुले झॉंझर (हिंदी) तक्षक (हिंदी) तेजाब (हिंदी) नरसिंह (हिंदी) प्रतिघात (हिंदी) बिनकामाचा नवरा सिंहासन हमला (हिंदी) हरी ओम विठ्ठला रवी पटवर्धन यांच्या गाजलेल्या मालिका अग्गंबाई सासूबाई झी मराठी मालिका आमची माती आमची माणसं (शेतकऱ्यांसाठीचा दैनिक मराठी कार्यक्रम) तेरा पन्‍ने महाश्वेता लाल गुलाबाची भेट  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार