सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निवडणुकीत जाती - जातीत निर्माण झालेले तेढ कमी करण्यासाठी मराठा महासंघाचा पुढाकार; अठरा पगड जातींना एकत्र आणून साधणार सामाजिक सलोखा

सामाजिक घटकांमध्ये निर्माण झालेली जातीय तेढ कमी करून सामाजिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने अखिल भारतीय मराठा महासंघाने पुढाकार घेतला आहे.

Shruti Turkane
  • Jun 17 2024 10:55AM

अहिल्यानगर: राज्यातील लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला. जाती - जातीत तेढ निर्माण झाली. सामाजिक घटकांमध्ये निर्माण झालेली जातीय तेढ कमी करून सामाजिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने अखिल भारतीय मराठा महासंघाने पुढाकार घेतला आहे. अठरापगड जातींसह समाजातील प्रत्येक घटकाच्या घरी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन शिवराज्याभिषेक सोहळा वर्षभर साजरा करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात अहिल्यानगरपासून केली जाणार असल्याने मराठा महासंघाने सांगितले.

मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. दहातोंडे म्हणाले, की स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक वर्षभर राज्यभरात साजरा करण्यात येत आहे. हा सोहळा प्रत्येक तालुक्यात, गावात, घरात, कार्यालयात साजरा व्हावा, यासाठी भेटी - गाठी घेऊन आवाहन करत आहोत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीही भेट देत आहोत.

अठरापगड जातींना बरोबर घेऊन हा उपक्रम राबवला जाणार आहे. ओबीसी मराठा यांच्यात पूर्वीपासूनच सलोखा होता आणि आहे, हा सलोखा पूर्वीप्रमाणेच टिकून राहावा, यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कुटुंबांना भेटी देणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रजयतेच राज्य आणले, याच विचारधारेवर मराठा महासंघाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र वारकऱ्यांचा, बहुजनांचा आहे. गावातील चावडीवर ओबीसींसह सर्व समाजघटकांना एकत्र बोलावणार आहोत, तेथे शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्याचे आवाहन करणार आहोत.

या कालावधीत स्थानिक पातळीवर प्रबोधने, व्याख्यानांचेही आयोजन केले आहे. विविध शासकीय कार्यालयांना छत्रपती शिवाजी महाराजांची सव्वा फूट उंचीची मूर्तीही भेट देणार आहोत. संघटनेची २३ जूनला नागपूर येथे बैठक होणार असून, जिल्हास्तरावरील कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या जाणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार