सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बदलत्या परिस्तितीचा विचार करून सर्व व्यापाऱ्यास नियंत्रित सूट मिळणे बाबत यवतमाळ जिल्हाधिकारी यांना उमरखेड व्यापारी वर्गाची मागणी

मागील काही दिवसापासून बरेच आस्थापना बंद आहेत , परिस्थितीचे गांभीर्य पाहून आम्हीपन प्रशासनास सहकार्य करीत आलो आहे ,

Sudarshan MH
  • May 16 2021 10:38AM

    
उमरखेड-प्रतिनिधी किरण मुक्कावार

    मागील काही दिवसापासून बरेच आस्थापना बंद आहेत , परिस्थितीचे गांभीर्य पाहून 
आम्हीपन  प्रशासनास सहकार्य करीत आलो आहे , कडक निर्बंध नसतांना सुद्धा आम्ही गावातील 
वाढते रुग्ण पहाता 10 दिवस पूर्ण व्यापारपेठ (जनता कर्फ्यू)
   बंद ठेवली ।मागील १ वर्षांपासून अर्धे व्यापारी कोरोना काळामुळे डबघाईत आलेले आहेत,त्यात अजून 
व्यापार बंद असल्यामुळे आर्थिक अडचण सोबत आता मानसिक तणाव सुद्धा वाढत आहे,कारण एकीकडे दुकान बंद तर दुसरीकडे पगार, भाडे,सर्व कर तसेच लाईट बिल वगैरे मुळे आता जीवन जगणे शक्य राहिले नाही , छोटे छोटे व्यापारी मोबाईल विक्री व साईकिल,मो.सा दुरुस्ती , चर्मकार , सलुन व्यवसायिक,
इलेकट्रीक विक्री व दुरुस्ती असे बरेच जणांचे हातावर पोट असते त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे.
   एकीकडे सोनार,कपडे दुकाने बंद तर दुसरी कडे लग्नास परवानगी , आणि सिमेंट गज दुकाने बंद तर बांधकामास परवानगी या मुळे सुद्धा व्यक्तिगत , पारिवारिक आणि आर्थिक संबंध जोपासण्यासाठी 
बंद व्यापार्यावर प्रचंड दबाव आहे , त्यात आता केलेले ५०००० रु दंड हे 
फार छोट्या चुकीला फार मोठी शिक्षा झाली . एखाद्या सामान्य व्यापाऱ्यास चुकीने दंड 
लागल्यास त्याला आत्महत्या करणे शिवाय पर्याय नाही , कारण सर्व व्यापाऱ्याचे कागद पत्र बँकेचे 
धनादेश हे सर्व दुकानातच असतात त्यामुळे सुद्धा बरेच वेळी या कामासाठी दुकाने उघडावी लागतात.  
   मागील काही दिवसातील परिस्थिती पहाता उमरखेड तालुक्यातील रुग्ण संख्या कमी झाली आहे 
तसेच पेरणीचे दिवस पण आलेच आहेत त्यामुळे बरेच शेतकरी वर्गाना जवळ असलेले सोने , चांदी मोडून बियाणे खते घ्यावे लागतात त्यामुळे सोनार व्यापारीचे दुकाने उघडणे अत्यावश्यक आहे , 
तसेच पावसा पासून संरक्षण करणे करिता घराची व गोठ्याची डागडुजी करणे सुद्धा अत्यावश्यक आहे 
त्याकरिता सुद्धा पत्रे,सिमेंट ची दुकाने उघडणे आवश्यक आहे , त्यात सर्व बंद व्यापार्याची मानसिक परिस्थिती आता खूप खालावली आहे त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था न झाल्यासपरिस्थिती गंभीर बनू शकते ।
   तरी या सर्व परिस्थितीचा विचार करून तसेच सर्व व्यापाऱ्याच्या व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व 
परिवाराच्या उदरनिर्वाहा चा विचार करून सर्व अटी आणि निर्बंध टाकून सर्व व्यापाऱ्यास काही वेळ 
का असेना परंतु व्यापार करण्याची परवानगी द्यावी,त्यानंतरही गरज असेल तेंव्हा सर्व व्यापारी प्रशासनास 
सहकार्य करतील.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार