सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मनसेची चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय बैठक संपन्न.

पालिका निवडणूकीत मनसेच प्रमुख पक्ष होईल - सचिन चिखले.

Sudarshan MH
  • Mar 3 2021 3:40PM
मनसेची चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय बैठक संपन्न...  
पालिका निवडणूकीत मनसेच प्रमुख पक्ष होईल - सचिन चिखले...
प्रतिनिधि :-दिपक चव्हाण पुणे
पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शहर मनसे प्रभारी रणजित शिरोळे यांनी उपस्थीत मनसैनिकांना मार्गदर्शन केले. तसेच प्रभागनिहाय नियुक्त्याही जाहीर केल्या.   
 
चिंचवड मतदारसंघातील प्रभाग क्र. १६ रावेत, प्रभाग क्र. १७ चिंचवडेनगर, प्रभाग क्र. १८ चिंचवडगाव, प्रभाग क्र. २२ काळेवाडी, प्रभाग क्र. २९, ३१, ३२ परिसरात बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले होते. दरम्यान प्रभाग क्र. ३२ सांगवी उपविभाग अध्यक्षपदी मंगेश मोहन भालेकर, प्रभाग अध्यक्ष आशिष अशोक माने, शाखा अध्यक्षपदी रूस्तम रूजबे ईरानी, प्रभाग क्र. ३१ मध्ये अनिकेत भगवान बलकवडे याची शाखा अध्यक्षपदी तर प्रभाग क्र २४ च्या प्रभाग अध्यक्षपदी संदेश पुरुषोत्तम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. 
 
यावेळी मनसे गटनेता तथा शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष राजू सावळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयुर चिंचवडे, शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी, शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, जनहित कक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ भालेराव, सचिव अनिकेत प्रभु, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, उप शहराध्यक्षा अनिता पांचाळ, मतदारसंघातील उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, संघटक व मनसैनीक उपस्थित होते.
 
रणजित शिरोळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय बैठकांचे नियाेजन केले आहे. त्यानुसार विभागवार बैठका घेणे सुरू आहे. महापालिका निवडणुकीपर्यंत नियोजनासाठी बैठकांच्या सर्वात जास्त फेऱ्या करणार आहोत. विभागनिहाय व प्रभागनिहाय बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रमुख मुद्यांवर चर्चा केली जात आहे. प्रत्येक बैठकीला मनसैनिकांची उपस्थिती लक्षणीय असते. या बैठकांची गर्दी पाहता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळणे निश्चित आहे. मात्र त्यासाठी मनसैनिकांनी जीवाचे रान करीत पक्षाचे ध्येयधोरणे जनतेपर्यत पोहोचविणे आवश्यक आहे. 
 
यावेळी मनसे गटनेता तथा शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले कि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला अवघे दहा महिने शिल्लक राहिले आहेत. गतवेळच्या महापालिका निवडणूक काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बऱ्यापैकी हवा हाेती व आताही आहे. आगामी महापालिका निवडणूकीत मनसे हाच कसा प्रमुख पक्ष होईल, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. निवडणुकीपर्यंत राजकीय हालचालींमध्ये कमालीचा बदल झालेला दिसला पाहिजे. पदाच्या माध्यमातून पक्ष प्रत्येकाला बळकटी देतच आहे.''
-

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार