सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्य अभियंत्यांची नियुक्ती नियमबाह्य,माहितीच्या अधिकारात उघड* *मुख्य अभियंता पदभरती घोटाळा

उच्च न्यायालयात याचिका दाखल* महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता पद भरती घोटाळा करण्यात आला निवड समितीने मर्जीतील उमेदवाराला गुण कमी असतांना गुण वाढवून त्यांची मुख्य अभियंता पदावर निवड केली सदर बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड झाल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ता नाना बांगडकर यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

Snehal Joshi .
  • Oct 16 2020 10:44AM
महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता पद भरती घोटाळा संपूर्ण राज्यात गाजला निवड समितीने पात्र उमेदवारांला डावलून नियमबाह्य अपात्र उमेदवारांची मुख्य अभियंता पदावर निवड केली सदर बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे त्यामूळे ऑल ईज वेल म्हणणाऱ्या महानिर्मिती कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. महानिर्मिती कंपनीने मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती "२०१७" प्रक्रिया २२ में २०१७ रोजी राबविली निवड समितीने ३ उमेदवारांची मुख्य अभियंता पदावर नियुक्ती केली मात्र पात्र उमेदवारांना डावलून निवड समितीने खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंत्यांची नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड केली यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता अशोक रामटेके यांनी जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक महाव्यवस्थापक (मास सेप्र) यांच्याकडे ३१ आगस्ट २०२० रोजी माहिती मागितली संबंधित माहिती अधिकाऱ्याकडून रामटेके यांना ६ ऑक्टोबर २०२० रोजी माहिती प्राप्त झाली असून २ मार्च २०२० रोजी झालेल्या प्रत्यक्ष मुलाखातीचे इतिवृत्त व वैयक्तिक मुलाखातीचा गुणदर्शक तक्ता जनमाहिती अधिकारी योगेंद्र पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता यांची मुख्य अभियंता पदावर निवड करतांना त्यांचे १० गुण वाढवून निवड समितीने मुख्य अभियंता पदावर नियमबाह्य निवड केल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.मुख्य अभियंता पद भरती घोटाळा उघड होताच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी तडकाफडकी चौकाशीचे आदेश दिले जवळपास एका महिन्यानंतर मुख्य अभियंता पदभरती घोटाळ्याच्या अहवाल ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या पटलावर ठेवण्यात आला सदर अहवालात नियमबाह्य पद्धतीने निवड केल्याचे नमूद केले असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे त्यामूळे महानिर्मिती कंपनी निवड समितीच्या हातून झालेली चूक दुरुस्त करणार असल्याची माहिती मिळाली आहे कार्यवाही करण्यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे मात्र नेमकी गाज कुणावर पडणार हे यावेळी सांगणे कठीण आहे महानिर्मिती कंपनीवर लागलेला डाग पुसून काढण्याच्या तयारीत असून मुख्य अभियंत्यांची ईतर ठिकाणी बदली करून मुख्य अभियंता पद भरती घोटाळा प्रकरणावर पडदा टाकण्याच्या तयारी सुरू आहे.खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता यांची निवड समितीने नियमबाह्य निवड केली वार्षिक वेतन वाढीसह मुख्य अभियंताना लाभ मागील तीन वर्षांपासून महानिर्मिती कंपनीकडून देण्यात आले आहे महानिर्मिती कंपनी झालेली चूक दुरुस्त करणार असल्याने त्यांना रिव्हर्ट करने अपेक्षित आहे त्यामूळे त्यांना दिलेले लाभ परत घेणार का?असा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र मुख्य अभियंत्यावर मेहरबानी करणाऱ्या निवड समितीवर कोणती कार्यवाही करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार