सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण परिणाम पुढे... ‘सामना’च्या अग्रलेखात

आघाडी सरकारच्या काळात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुन्हा पुन्हा निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे ठरत असते, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Snehal Joshi .
  • Feb 6 2021 5:34PM
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणुका होण्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही राऊतांच्या सूरात सूर मिसळलेकाँग्रेसला पाच वर्षासाठी विधानसभा अध्यक्षपद दिलं होतं. काँग्रेसने एकाच वर्षात राजीनामा दिला, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. संजय राऊत यांना निवडणूक पुन्हा होणार, याबद्दल एकच काळजी वाटत असेल, तर ती सर्वांनाच वाटत आहे, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. “शरद पवार म्हणाले, की विधानसभा अध्यक्षपद खुलं झालं आहे, त्यामुळे पुन्हा चर्चा होईल. सरकार स्थापन करताना पाच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद ठरलं होतं, तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील, हे कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे तीन पक्ष एकत्र निर्णय घेतील. तीन पक्षांचं बहुमत असलेलं हे सरकार आहे, त्यामुळे हा प्रकार टाळायला हवा होता” अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.आघाडी सरकारच्या काळात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुन्हा पुन्हा निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे ठरत असते, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.  काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल, असंही सामनाच्या अग्रलेखात सुचवलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार