सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ लिपीक कोलते यांना अटक

म जी प्रा चे निलंबीत वरिष्ठ लेखापाल राजेश हाडके व नर्मदा गृपचे प्रवर्तक सचिन होले यांच्या अडचनीत वाढ

Snehal Joshi .
  • Aug 2 2020 10:17PM
आष्टी तालुक्यातील काकडधरा येथील रहिवासी दिनेश कोडुलकर, भुषण अजमिरे, गजानन मानकर यांनी नर्मदा गृप ऑफ कन्स्ट्रक्शनचे प्रर्वतक सचिन होले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे परवाणा मिळण्याबाबत खोटे दस्तऐवज तयार करुण परवाणा मिळविण्याकरीता मजीप्रा चंद्रपूर मंडळातील कार्यरत वरिष्ठ लिपीक मोरेश्वर जगन्नाथ कोलते राहणार सुर्वे नगर नागपूर यांच्या माध्यमातुन परवाणा मिळविला परंतु तो बोगस असल्याचे तळेगाव येथील समाज सेवक प्रकाश वाघमारे यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या तक्रारीतून निष्पन्न झाले या वरुण जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओम्बासे यांनी शासना तर्फे फियादी कार्यकारी अभियंता विलास काळबांडे यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली होती. आरोपी मोरेश्वर कोलते यांना दि. ३१ जुलै रोजी नागपूर येथून शहर पोलीसांनी ताब्यात घेतले. सविस्तर वृत्त असे की तळेगाव जिप सर्वâलच्या सदस्या अंकिता होले यांचे पती नर्मदा गृप ऑफ कन्स्ट्रक्शनचे प्रवर्तक सचिन होले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये निविदा दाखल करण्याकरीता लागणारे परवाणा पत्र तयार करतांना चंद्रपूर येथील मजीप्राचे मंडळ अधिक्षक अभियंता यांच्याकडे दस्तऐवज सादर करते वेळी नागपूर येथील सुर्वे नगरमध्ये राहणारे मोरेश्वर जगन्नाथ कोलते यांच्या माध्यमातन अधिक्षक अभिंयत्याकडे दस्त सादर करून त्यांची स्वाक्षरी घेण्या ऐवजी पोलीस सुत्रांनी तपासादरम्यान मोरेश्वर जगन्नाथ कोलते यांनी स्वत:च हस्ताक्षर केल्याचे दिसून येत असल्यामुळे नर्मदा गृप ऑफ कन्स्ट्रक्शनचे संचालक दिनेश कोंडूलकर, गजानन मानकर व वंâत्राटदार भूषण अजमिरे यांच्यासह आरोपी मोरेश्वर कोलते यांच्यावर भादंवि कलम ४२०,४६५,४६७,४६८ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गजानन मानकर, दिनेश कोंडुलकर, भूषण अजमिरे यांनी यापूर्वीच अटक पूर्व जामीन मिळविला होता. तर मजीप्राचे वरिष्ठ लिपिक मोरेश्वर जगन्नाथ कोलते हे सतत पोलीसांना चकमा देत होते. मात्र ३१ जुलै रोजी ते पोलीसांच्या सापळ्यात अटकले. मोरेश्वर कोलते यांना ३ आगस्ट पर्यत पोलीस कोठडी मिळाली असून यात आणखी राजकीय वलय असलेले व्यक्ती आरोपी होण्याची दाट शक्यता असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चन्नोर यांनी सांगितले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपविभागीय पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक योगेश पारधी पुढील तपास करीत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार