*राज्यात सी बी एस ई बारावीचा परीक्षेत अकोला अव्वल*
सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल सोमवार, ता. 13 जुलै रोजी दुपारी घोषित झाला आहे.
सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल सोमवार, ता. 13 जुलै रोजी दुपारी घोषित झाला आहे. प्रभात सिनिअर सेकंडरी स्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून, समीक्षा मोडकने सर्वाधिक 95.2 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर स्कूल ऑफ स्कॉलरच्या स्वराली कुळकर्णीने 91.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.
सीबीएसई इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रभात किड्सच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे आचल काळपांडे, गायत्री राणे, मुस्कान गुप्ता, ओम आगरकर, ओम बढे, प्रतिक करंगळे, पूर्वी निंबाळकर, रोहन सरदार, संकेत गवई, श्रेयस वानखडे, तमजीद खान, वैष्णवी नळकांडे आणि यश वानखडे यांनी "ए-' ग्रेड प्राप्त केला आहे.
पूर्वी निंबाळकर 93.60 टक्के गुण घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आचल काळपांडे 92.60 टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. तसेच 21 विद्यार्थी ए- ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे व वंदना नारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
आंचल बोर्डातून प्रथम
आचल काळपांडे या विद्यार्थीनीने फिजीकल या विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन बोर्डातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. प्रभात किड्स स्कूलची सीबीएसई उच्चमाध्यमिक इयत्ता बारावीची ही दुसरी बॅच असून, प्रभातच्या एकूण 42 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प