सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड़ शहर रात 10लाख लाडू प्रसादाचे होनार वाटप आमदार महेश लांडगे

रामजन्मभूमी अयोध्या येथे उद्या (दि.५ ऑगस्ट) श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाचा

Deepak Chauhan
  • Aug 4 2020 4:33PM
   प्रतिनिधी दिपक चव्हाण पुणे 
रामजन्मभूमी अयोध्या येथे उद्या (दि.५ ऑगस्ट) श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाचा समारंभ होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने तब्बल १० लाख मोतीचूर लाडुचे वाटप करण्यात येईल. तसेच, अत्यंत भक्तीमय वातावरणात राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली. 


अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (बुधवारी) श्रीराम मंदिर भूमिपूजन होणार आहे. त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भाजपा हा सोहळा उत्सव म्हणून साजरा करण्याच्या तयारीत आहे. 
पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येईल. इंद्रायणीनगर येथील येथे मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली आहे.  

लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करण्यात येत आहेत. 

संपूर्ण राष्ट्र ‘राम’ मय करा : आमदार महेश लांडगे याबाबत आमदार लांडगे म्हणाले की, श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा होणार आहे. 

 या सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील १० लाख घरात बुंदीचे लाडू वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याच्ये भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आपण सर्वांनी आपापल्या घरातून हा सोहळा साजरा करावा व त्याद्वारे आपला परिसर, राज्य व राष्ट्र राममय करावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार